लाडक्या बहिणींसाठी मकरसंक्रांत ठरणार गोड! नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारीचे ४५०० रुपये एकत्र येणार? वाचा सविस्तर अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Installment Update | ​डिसेंबर महिना संपायला आता अवघे ७ दिवस उरले आहेत आणि थंडीचा कडाका जसा वाढतोय, तशीच चर्चा आता ‘लाडकी बहीण योजने’च्या हप्त्याबाबतही रंगू लागली आहे. दिवाळी सरली तरी अजून अनेक बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे साहजिकच “आमचे पैसे कधी येणार?” हा प्रश्न प्रत्येक लाडकी बहीण विचारत आहे. पण आता काळजी करू नका, कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

तिन महिन्यांचे पैसे एकत्र येणार?

नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर पडला, पाठोपाठ डिसेंबरही संपत आला. आता चर्चा अशी आहे की, सरकार नोव्हेंबर, डिसेंबर आणि येणाऱ्या जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रच महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी करत आहे. म्हणजेच, मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यात ‘खटाखट’ ४५०० रुपये जमा होऊ शकतात. संक्रांतीला सुवासिनींना वाण देण्याची प्रथा आहे, आणि यंदा हे ४५०० रुपयांचे ‘सरकारी वाण’ महिलांची संक्रांत अधिक गोड करेल असं दिसतंय.

मकरसंक्रांतीचा मुहूर्त आणि ४५०० रुपये!

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीपूर्वी हे पैसे महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. जरी अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी प्रशासकीय पातळीवर या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या वाणासाठी बहिणींना आता कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही.

पण… ‘हे’ महत्त्वाचे काम राहिले असेल तर पैसे अडकणार!

बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ४५०० रुपयांची ही रक्कम खात्यात येण्यासाठी तुमची eKYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. म्हणजेच तुमच्याकडे आता फक्त ७ दिवस उरले आहेत. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल, तर हप्ता मंजूर होऊनही तो तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांकडे लक्ष न देता, आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन किंवा मोबाईलवरून आपली केवायसी आजच पूर्ण करून घ्या.

​वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात लाडक्या बहिणींसाठी आर्थिक बळ देणारी ठरणार आहे. थकीत हप्ते एकाच वेळी मिळाल्यास घरखर्चाला आणि लहान-मोठ्या गरजांना मोठा आधार मिळेल, हे नक्की!

Leave a Comment