नमो शेतकरी योजनेची लाभार्थ्यांची जाहीर! यांच्यात खात्यावरती येणार आठवा हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सध्या मोठ्या बदलांच्या टप्प्यातून जात आहे. या योजनेतून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, शासनाने लागू केलेल्या कडक निकषांमुळे हजारो शेतकरी योजनेबाहेर फेकले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आगामी आठव्या हप्त्यात केवळ ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावरच रक्कम जमा केली जाणार आहे. Namo Shetkari Yojana

आतापर्यंत या योजनेच्या २० व्या हप्त्याचा लाभ सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र २१ व्या हप्त्यावेळी ही संख्या थेट ९२ ते ९३ लाखांपर्यंत घसरली. आता आठव्या हप्त्याच्या वेळी ही संख्या आणखी कमी होऊन ९० लाखांच्या आसपास येऊन ठेपली आहे. या आकड्यांवरूनच शासनाकडून सुरू असलेली छाननी किती कठोर आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

मोठ्या प्रमाणावर शेतकरी वगळले जाण्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारने लागू केलेले नवे आणि कडक नियम. या तपासणीत सुमारे २८ हजार मृत लाभार्थी योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबर सुमारे ३५ हजार दुहेरी लाभार्थ्यांनाही यादीतून हटवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती विशेषतः नवरा आणि बायको दोघांच्या नावावर लाभ घेत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर शासनाने थेट रेशन कार्डाच्या आधारे एका कुटुंबाला एकच लाभ असा नियम लागू केला आहे. यामुळे अशा कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

याशिवाय आयटीआर भरलेले शेतकरी, सेवा क्षेत्राशी संबंधित उत्पन्न असलेले लाभार्थी, तसेच अपात्र ठरणाऱ्या इतर शेतकऱ्यांचीही कसून तपासणी सुरू आहे. या तपासणीमुळे पुढील काळात नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावागावात अनेक शेतकरी आपला हप्ता का थांबला? या प्रश्नाने कृषी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, हा हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र ज्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले गेले आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अन्यथा पुढील हप्त्यांपासूनही या योजनेचा लाभ मिळणे कठीण होऊ शकते, अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.

Leave a Comment